Maharashtra

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांचे नवे आव्हान :

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांचे नवे आव्हान :

सांगली. दि. 10 एप्रिल 2026;
भा.प्र.से. संजीता मोहपात्रा या १५ एप्रिल २०२६ रोजी पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी नागरिकांना एक वेगळे आणि समाजाभिमुख आवाहन केले आहे.

स्वागतासाठी पुष्पगुच्छ किंवा हार न आणता, शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके, स्पर्धा परीक्षा साहित्य किंवा प्रेरणादायी पुस्तके भेट द्यावीत, अशी विनंती त्यांनी केली आहे. जमा होणारे साहित्य महानगरपालिका शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना व ग्रंथालयांसाठी वापरण्यात येणार आहे.

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून त्यांची सांगली महापालिकेत बदली झाली असून, “पुष्पगुच्छापेक्षा ज्ञानाची भेट अधिक मौल्यवान” असा संदेश देत त्यांनी ‘पुस्तक व शालेय साहित्य दान’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button