राजापुर मध्ये पाणीबाणी ;
राजापुर मध्ये पाणीबाणी ;
जि.रत्नागिरी.ता(राजापूर):दि. 06 एप्रिल 2026;
राजापुरात दर शनिवारी मेन्टेनन्सच्या कारणास्तव पाणीपुरवठा बंद राहणार, नळ कनेक्शनला पंप जोडण्याचे आढळून आल्यास नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येणार, राजापूर नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना आवाहन.
राजापूर शहरामध्ये नळ कनेक्शन ला पंप जोडलेले आढळून आल्यामुळे राजापूर नगर परिषदेने आता कठोर भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे. कोदवली धरणामध्ये आगामी काही काळात पाणीसाठा कमी होऊ शकतो. त्यातच शहरातील काही नागरिक नळ जोडणी ला पंप लावून जादाचे पाणी खेचत आहेत. त्यामुळे नळ कनेक्शन ला पंप लावल्याचे आढळून आल्यास सदर घराचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येईल.
त्याचप्रमाणे मेंटेनन्स साठी दर शनिवारी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तरी शहरवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन राजापूर नगर परिषदेने केले आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे

