Maharashtra

प्रशासनाला उशिरा आलेली जाग; सभापतींचे कारवाईचे निर्देश

प्रशासनाला उशिरा आलेली जाग; सभापतींचे कारवाईचे निर्देश
सांगली | दि. 3 एप्रिल 2026
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची दुरावस्था गंभीर बनल्याचे स्पष्ट झाले असून, स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी आज सकाळी स्वतः पाहणी करून प्रशासनाला कडक निर्देश दिले.
आज सकाळी सुमारे आठ वाजता झालेल्या पाहणीत स्टेडियममधील पॅव्हेलियनची जीर्ण अवस्था, ड्रेनेज चेंबरची दुरवस्था आणि प्रवेशद्वारांची मोडकळीस आलेली स्थिती समोर आली. याशिवाय, स्टेडियमच्या सभोवतालच्या इमारतींमधून कचरा थेट बाहेर टाकला जात असल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढल्याचेही निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. स्टेडियम परिसरात कचरा टाकणाऱ्या संबंधित रहिवाशांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
स्टेडियमच्या सुधारणा कामांना गती देताना दोन्ही प्रवेशद्वारांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पॅव्हेलियनमध्ये दुरुस्ती करून खेळाडूंसाठी चेंजिंग रूम तसेच टॉयलेट-बाथरूमची सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच, स्टेडियमची देखभाल नियमित राहावी यासाठी कायमस्वरूपी वॉचमन नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने वॉचमनसाठी निवासाची सोय म्हणून 1RK घर बांधण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अतुल माने यांनी दिली.
या उपाययोजनांमुळे स्टेडियमचे कायापालट होऊन खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
**पत्रकार : विजय रणभोर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button