नाशिकमध्ये हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या;
नाशिकमध्ये हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या;
नाशिक | प्रतिनिधी

आज नाशिक येथे हिंदू महासभेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. बैठकीत संघटन विस्तार आणि आगामी कार्यक्रमांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
या वेळी बापू दापसे यांची नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिल्यानगर शहर संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच अभिषेक शेळके यांची नाशिक शहर उपाध्यक्षपदी, तर रामेश्वर तिवारी यांची त्र्यंबकेश्वर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याचबरोबर आर्किटेक्ट हर्षल अमृतकार यांचीही नाशिक शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या सर्व नियुक्त्या हिंदू महासभा प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शुक्ल यांच्या हस्ते करण्यात आल्या.
बैठकीदरम्यान संघटन अधिक बळकट करण्यावर, युवकांना जोडण्यावर तसेच विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यावर विशेष भर देण्यात आला. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करून संघटनेचा विस्तार वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी अॅड. पंकज चौहान नाशिक शहर अध्यक्ष, होराभूषण मिलिंद गोसावी, आध्यमिक आघाडी अधक्ष्य आणि कौस्तुभ जाखडी पुरोहित आघाडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ह्या नियुक्त्या हिंदू महासभेचे पदाधिकारी अभयजी कुलकर्णी, आनंदजी दवे आणि मनोजजी तारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
