Maharashtra

नागपूरमध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात; पुणे संघाचा तृतीय क्रमांक

नागपूरमध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात; पुणे संघाचा तृतीय क्रमांक

नागपूर : महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा नागपूर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडल्या. या स्पर्धेत राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
अत्यंत चुरशीच्या आणि रंगतदार सामन्यांनंतर पुणे संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. संघाच्या या यशामध्ये व्यवस्थापक सर विलास घोगरे आणि निलेश जगताप यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
संघाचे प्रशिक्षक केतन शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, जिद्द आणि कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
पुणे संघातील खेळाडू :
संकेत पाटील, मल्हार ठोंबरे, तुषार जाधव, ओम मानकर, आफान खान, ऋषी चौधरी आणि मनोज डोंगळे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे संघावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button