Maharashtra

मुंबई विमानतळावर भीषण आग: टर्मिनल 1B मध्ये शॉर्ट सर्किटचा संशय

मुंबई विमानतळावर भीषण आग: टर्मिनल 1B मध्ये शॉर्ट सर्किटचा संशय

मुंबई, ९ एप्रिल २०२६:
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टर्मिनल 1B मध्ये आज संध्याकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, टर्मिनल 1B च्या ग्राउंड फ्लोअरवरील केबल ट्रे आणि स्विचबॉक्समधून आग लागली. सुरुवातीला विमानतळाच्या अंतर्गत अग्निशमन यंत्रणेकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग वाढत असल्याने मुंबई अग्निशमन दल यांना पाचारण करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे काही उड्डाणांवर तात्पुरता परिणाम झाला. मात्र प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षितता प्राधान्याने राखत परिस्थिती लवकर नियंत्रणात आणली. सध्या विमानतळावरील कामकाज हळूहळू पूर्ववत होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button