Maharashtra

करजगांव येथे वीज पडून शेतकऱ्याची दुभती गाय ठार तलाठी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पंचनामा; शासकीय मदतीची मागणी

दिनांक: 2 एप्रिल 2026
करजगांव येथे वीज पडून शेतकऱ्याची दुभती गाय ठार
तलाठी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पंचनामा; शासकीय मदतीची मागणी
भोकरदन (जालना) – तालुक्यातील करजगांव येथे अवकाळी पावसासह झालेल्या विजेच्या कडकडाटात एका शेतकऱ्याची दुभती संकरित गाय ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत शेतकरी परमेश्वर संतोषराव लोखंडे यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या राज्यभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे गारपीट आणि विजांचा कडकडाट सुरू असून त्याचा फटका भोकरदन तालुक्यातील करजगांव परिसराला बसला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या लोखंडे यांनी व्याजाने पैसे उधार घेऊन दुभती गाय खरेदी केली होती. दुधाच्या व्यवसायातून काही आर्थिक आधार मिळेल, या आशेने त्यांनी हे पाऊल उचलले होते. मात्र, अचानक झालेल्या विजेच्या तडाख्यात ही गाय ठार झाल्याने त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले.
या घटनेनंतर तलाठी दाहीजे मॅडम आणि पशुवैद्यकीय अधिकारी सपकाळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यावेळी हरीभाऊ विठ्ठल नरवाडे, रमेश दौलतराव लक्कस, कल्याण शेषराव लोखंडे, भागवत रतन नरवाडे, सचिन समाधान लोखंडे यांसह गावकरी उपस्थित होते.
दरम्यान, या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती बोरशे गुरुजी यांनी दिली.
अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी महेंद्र बेराड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button