Maharashtra

जिद्दीची उंच भरारी! अजय गायकवाड झाले सांख्यिकी अधिकारी.

जिद्दीची उंच भरारी! अजय गायकवाड झाले सांख्यिकी अधिकारी.

 

टाकळी भान प्रतिनिधी :-श्रीरामपूर तालुक्यातील वांगी गावचे रहिवासी अजय गायकवाड यांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षेत यश संपादन करून सांख्यिकी अधिकारी या पदावर निवड झाली आहे. या यशामुळे परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजय गायकवाड यांचे वडील अंबादास गायकवाड हे शेतकरी असून आई सुरेखा गायकवाड या गृहिणी आहेत. त्यांच्या यशामुळे आईवडिलांना मोठा आनंद झाला असून कुटूंबातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर अजय गायकवाड यांनी हे यश संपादन केले आहे.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान त्यांनी नियमित अभ्यास, मागील प्रश्नपत्रिकांचा सराव आणि वेळेचे योग्य नियोजन यावर विशेष भर दिला. त्यांच्या यशामागे कुटुंबीयांचे पाठबळ तसेच मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

अजय गायकवाड यांच्या या उल्लेखनीय यशामुळे श्रीरामपूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, श्रीरामपूरकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button