Maharashtra

जिद्द आणि चिकाटीचे फळ: ललगुण केंद्र शाळेची माजी विद्यार्थिनी हिमगौरी ननावरे हिची ‘राज्य कर सहाय्यक’ पदी निवड;

जिद्द आणि चिकाटीचे फळ: ललगुण केंद्र शाळेची माजी विद्यार्थिनी हिमगौरी ननावरे हिची ‘राज्य कर सहाय्यक’ पदी निवड;

जि. सातारा.ता. (खटाव)अनपटवाडी :दि. 12 एप्रिल 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत अनपटवाडीची सुकन्या हिमगौरी घनश्याम ननावरे हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. हिमगौरीची ‘राज्य कर सहाय्यक’ (State Tax Assistant) पदी निवड झाली असून, एका ग्रामीण भागातील कन्येने प्रशासकीय सेवेत झेप घेतल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हिमगौरीचे प्राथमिक शिक्षण (इ. १ ली ते ४ थी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनपटवाडी येथे झाले. त्यानंतर इ. ५ वी ते ७ वी चे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा ललगुण येथे पूर्ण केले. विशेष म्हणजे २००९ साली माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून तिने आपल्या गुणवत्तेची पहिली पाऊलखूण उमटवली होती. माध्यमिक शिक्षण श्री सेवागिरी विद्यालय, पुसेगाव येथे पूर्ण केल्यानंतर तिने सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधून एम.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन केली.

२०२१ पासून हिमगौरी प्रत्येक परीक्षेत यशाच्या अगदी जवळ पोहोचत होती, परंतु यश हुलकावणी देत होते. मात्र, हार न मानता तिने आपला अभ्यास सातत्याने सुरू ठेवला. २०२४ मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात तिने ‘राज्य कर सहाय्यक’ पदाला गवसणी घातली. तिच्या या यशात आई-वडील, प्राथमिक शाळेतील मार्गदर्शक शिक्षक नीता बनकर ,विनोद गोडसे , संजय भुजबळ कै.राजेंद्र बंडगर , दमयंती भुजबळ,तत्कालीन केंद्रप्रमुख जयवंत भोसले, उपशिक्षणाधिकारी डी एम भोसले साहेब यांचा मोलाचा वाटा असल्याचे गौरी नमूद करते

​तिच्या या यशामुळे अनपटवाडी, ललगुण आणि पुसेगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button