Maharashtra

घरफोडी, जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस वाळूज पोलिसांकढून अटक

घरफोडी, जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस वाळूज पोलिसांकढून अटक; ९ गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त;

जि. संभाजीनगर, ता. (वाळूज):दि. 08 एप्रिल 2026:
वाळूज पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी, जबरी चोरी तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक करून तब्बल ९ गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत सुमारे ३,०७,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाळूज पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्रमांक 72/2026 (कलम 305, 331(3), 331(4) बीएनएस) अन्वये तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे व त्यांच्या पथकाला आरोपी बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीने वाळूज, एमआयडीसी परिसर, तसेच इतर भागांमध्ये घरफोडी व वाहन चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले चांदीचे दागिने, रोख रक्कम व तीन मोटारसायकली जप्त केल्या.

या आरोपीवर छत्रपती संभाजी नगर जिल्हा व ईतर जिल्ह्यात चोरी व घरफोडीचे वाहान चोरीचे गुन्हे समाविष्ट आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त मा. प्रविण पवार व पोलीस उप आयुक्त मा. पंकज अतुलकर मा.सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर श्रीमती. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे उपनिरीक्षक अजय शितोळे.पोलीस अंमलदार विजय पिंपळे.सुधाकर पाटील.नितीन धुळे.सुखदेव भागडे. दशरथ खोसरे. व इतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. सदरील आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button