Maharashtra

दत्तावाडी–नेरे परिसरात वीजेचा लपंडाव; व्होल्टेज चढ-उतारामुळे नागरिक हैराण

दत्तावाडी–नेरे परिसरात वीजेचा लपंडाव; व्होल्टेज चढ-उतारामुळे नागरिक हैराण

पुणे (प्रतिनिधी): दत्तावाडी–नेरे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत असून, त्यातच व्होल्टेज कमी-जास्त होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती उपकरणांवर परिणाम होत असून, अनेकांना कामकाजात अडथळे येत आहेत.

नागरिकांनी वारंवार महावितरण (MSEDCL) संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क साधला असता अधिकारी फोन उचलत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या समस्येमुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button