Maharashtra

धाराशिवमध्ये सामूहिक विवाह सोहळा; ३० मार्चपासून नोंदणीला सुरुवात;

धाराशिवमध्ये सामूहिक विवाह सोहळा; ३० मार्चपासून नोंदणीला सुरुवात;

जि. (धाराशिव) :1 एप्रिल 2026
हजरत ख्वाजा शामशुद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा भव्य सामूहिक विवाह सोहळा यंदा १८ व्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा १९ एप्रिल २०२६ रोजी गाजी मैदान, दारुल उलूम शम्सिया, धाराशिव येथे पार पडणार आहे.

इस्लामी दिनदर्शिकेनुसार १ जिलकद १४४७ हिजरी रोजी विवाह विधी संपन्न होणार असून, समाजातील गरजू कुटुंबांना दिलासा देत साधेपणाने विवाह पार पाडण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाचे प्रमुख आयोजक सय्यद नादेरुल्लाह हुसेनी असून, गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे.

इच्छुक जोडप्यांसाठी नोंदणी ३० मार्चपासून सुरू झाली असून १२ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे. विवाहासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी व नियम याबाबत आयोजकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांनी अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने विवाह करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार:विजय रणभोर. पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button