Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड सर यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड सर यांचे आवाहन

पारध/ महेंद्र बेराड– भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा त्यांच्या दारी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पारध येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी महेंद्र बेराड सर यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थी महिला वयोवृत्त नागरिक सर्वसामान्य जनता यांना या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

महसूल मंडळ पिंपळगाव रे. अंतर्गत सोमवार, दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता रेणुकामाता मंदिरासमोरील सभागृह, पिंपळगाव रे. येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपल्या दारी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, निवासी दाखले, जमीनविषयक कागदपत्रे आदी कामे एकाच ठिकाणी तात्काळ पूर्ण करून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

याबाबत बोलताना महेंद्र बेराड म्हणाले की, “शासनाच्या अनेक योजना माहितीअभावी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हे अभियान म्हणजे शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे पारध परिसरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी, महिला वर्गांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घ्यावा.”

या उपक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती अशीमा मित्तल, उपविभागीय अधिकारी बी. सर्वनन, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे तसेच मंडळ अधिकारी रमा घेवंदे तसेच मंडळ विभाग अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तरी पारध- पिंपळगाव रेणुकाई सर्कल मधील परिसरातील सर्व नागरिकांनी या शासकीय अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महेंद्र बेराड सर सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button