Maharashtra

बनावट आधारकार्डावर बालविवाहाचा प्रयत्न हाणून पाडला; ‘चाईल्डलाईन’ची सतर्कता;

बनावट आधारकार्डावर बालविवाहाचा प्रयत्न हाणून पाडला; ‘चाईल्डलाईन’ची सतर्कता;

जि. अकोला.(ता.बार्शीटाकळी):दि. 1 एप्रिल 2026,
बार्शीटाकळी परिसरातील एका गावात बनावट आधारकार्डाच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न ‘चाईल्डलाईन’ व स्वयंसेवी संस्थांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलीचा विवाह २४ वर्षीय तरुणासोबत लावण्याची तयारी सुरू होती. याची माहिती ‘चाईल्डलाईन’, ‘ॲसेस टू जस्टीस’ व आय.एस.डब्ल्यू.एस. संस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विवाह थांबवला.

या तपासात मुलीचे मूळ वय १७ वर्ष असताना बनावट आधारकार्ड तयार करून वय वाढविण्यात आल्याचे उघड झाले. संबंधित पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात आणून बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली.

प्रकरण पुढे अकोला येथील बाल कल्याण समितीसमोर मांडण्यात आले. समुपदेशनानंतर दोन्ही पक्षांना कडक इशारा देण्यात आला. अल्पवयीन मुलींच्या विवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक व शैक्षणिक दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचे लेखी हमीपत्र दोन्ही बाजूंच्या पालकांकडून घेण्यात आले.

ही कारवाई बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, ॲड. शीला तोष्णीवाल, प्रांजली जयस्वाल, बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, चाईल्डलाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, कम्युनिटी सोशल वर्कर पूजा मनवर आदींच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वी झाली.

पत्रकार:विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button