Maharashtra

अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोन नगरसेवकांचे पद रद्द होण्याची शक्यता;

अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोन नगरसेवकांचे पद रद्द होण्याची शक्यता;

कल्याण. दि. 11 एप्रिल 2026:
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी प्रभाग क्रमांक १७ मधील दोन नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्त्या सोनी क्षीरसागर यांनी याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, आडीवली येथील नगरसेवक कुणाल पाटील यांचे बंधू अनिल पाटील यांनी १७ मार्च २०२१ रोजी बनावट बांधकाम परवानगी कागदपत्रांच्या आधारे जी+४ इमारत उभारल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी २७ सप्टेंबर २०२२ रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईही करण्यात आली आहे.

मात्र, २०२५ च्या निवडणुकीदरम्यान या प्रकरणाची माहिती निवडणूक अर्जात न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कुणाल पाटील यांचे नगरसेवक पद रद्द करून पोटनिवडणूक घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

याशिवाय, माजी नगरसेवक गणेश भाने व त्यांच्या कुटुंबीयांवरही आडीवली परिसरात अनधिकृत बंगला बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी सोनी क्षीरसागर यांनी केली आहे.

या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button