Maharashtra

आयएएस तुकाराम मुंढे यांचा नवा आदर्श; आईच्या अस्थींवर वटवृक्ष लावून दिला पर्यावरणाचा संदेश मुंबई

आयएएस तुकाराम मुंढे यांचा नवा आदर्श; आईच्या अस्थींवर वटवृक्ष लावून दिला पर्यावरणाचा संदेश

मुंबई : दि. ५ एप्रिल २०२६
राज्याचे शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून समाजासमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
आपल्या आई स्व. आसराबाई मुंढे यांच्या निधनानंतर त्यांनी पारंपारिक कर्मकांडांना फाटा देत एक आगळावेगळा निर्णय घेतला. प्रथेनुसार अस्थी नदीत किंवा तीर्थक्षेत्री विसर्जित न करता, त्यांनी आपल्या घराच्या आवारात त्या अस्थींवर वटवृक्ष लावला. या कृतीतून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा ठोस आणि सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवला आहे.
परंपरांना छेद, पर्यावरणाला प्राधान्य
मुंढे यांनी दहावा, तेरावा किंवा गोडजेवण यांसारखे पारंपारिक विधी न करण्याचा निर्णय घेतला. “केवळ दोन दिवस आम्ही कुटुंबीय सांत्वनपर भेटीसाठी उपलब्ध राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले. दुःखाच्या प्रसंगातही त्यांनी वेळेची शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा जपल्याचे यातून दिसून येते.
त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, अंधश्रद्धा आणि कालबाह्य परंपरांपेक्षा पर्यावरण आणि सामाजिक जाणीव अधिक महत्त्वाची असल्याचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
— पत्रकार : विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button