Maharashtra

आदिवासी समाजातील लेकीची उतुंग भरारी; पुणे ग्रामीण पोलिस दलात निवड;

आदिवासी समाजातील लेकीची उतुंग भरारी; पुणे ग्रामीण पोलिस दलात निवड;

जि. पुणे :ता. (खेड);
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुली काय करू शकतात, याचे उत्तम उदाहरण सायगावच्या लेकीने कु.कविता तुकाराम खंडवे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सायगावची विद्यार्थिनी ता खेड जिल्हा पुणे ग्रामीण पोलीस दलात दाखल झाली आहे. या यशावर आधारित सायगावच्या जिल्हा परिषद शाळेची ‘लेक’ आता खाकी वर्दीत!

“यशाचा मार्ग कष्टातून जातो आणि कष्टाला जर जिद्दीची जोड असेल, तर आभाळही ठेंगणे वाटते.” हेच पुन्हा एकदा सिद्ध केले आहे सायगावच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलगी आज पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून दाखल झाली असून, तिने आपल्या गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात उज्ज्वल केले आहे.

जि.प. शाळेचा पाया आणि यशाचे शिखर,

ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळेत या मुलीचे प्राथमिक शिक्षण झाले. मूलभूत शिक्षण भक्कम असल्याने आणि शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तिचे ध्येय नेहमीच उंच राहिले. एका बाजूला शेतीतील कामे आणि दुसऱ्या बाजूला मैदानी सराव व अभ्यास, असा तिचा दिनक्रम होता. कोणत्याही खासगी अकॅडमीचे फाजील लाड न घेता, केवळ स्वतःच्या मेहनतीवर तिने हे यश संपादन केले आहे.

संघर्षातून वर्दीपर्यंतचा प्रवास
पोलीस भरतीची प्रक्रिया अत्यंत खडतर असते. पहाटे लवकर उठून धावण्याचा सराव करणे, गोळाफेक, लांब उडी यांसारख्या शारीरिक चाचण्यांमध्ये स्वतःला सिद्ध करणे आणि त्यानंतर लेखी परीक्षेतही अव्वल राहणे, हे सोपे नव्हते. मात्र, ‘मला खाकी वर्दी मिळवायचीच आहे’ हा निश्चय तिला स्वस्थ बसू देत नव्हता.

“माझ्या यशाचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांना आणि माझ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जाते, ज्यांनी माझ्यावर विश्वासाने संस्कार केले.” शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला..

पत्रकार:विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button