Maharashtra

वळसंगमध्ये विजयाचा जल्लोष! गोपीचंद पडळकर यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; भाऊसाहेब दुधाळ आणि माधवी काकींचाही जंगी सत्कार!

वळसंगमध्ये विजयाचा जल्लोष! गोपीचंद पडळकर यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; भाऊसाहेब दुधाळ आणि माधवी काकींचाही जंगी सत्कार!

वळसंग : (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यनियुक्ती झाल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा वळसंग येथे ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या वतीने ऐतिहासिक सत्कार करण्यात आला.या सोहळ्याच्या निमित्ताने वळसंग परिसरात भाजपचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.याच कार्यक्रमात नूतन पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब दुधाळ आणि जिल्हा परिषद सदस्या माधवी काकी पडळकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

“जनसामान्यांचा बुलंद आवाज आता प्रदेश पातळीवर पोहोचला आहे,”अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या या भव्य सत्कार सोहळ्याचे नेटके नियोजन वळसंग येथील युवा नेते केंचराव वगरे,रमेश माळी आणि संजय शिंदे (सरकार) यांनी केले होते.त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत नेत्यांचे जंगी स्वागत केले.

या सोहळ्याला वळसंगचे ग्रामपंचायत अधिकारी,स्थानिक पदाधिकारी आणि वळसंग परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व उत्साहामुळे संपूर्ण वळसंग परिसर ‘भाजपमय’ झाला होता.

प्रतिनिधी : संजय कोळी. जत/सांगली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button