Maharashtra

वळसंगचे लोकप्रिय व्यक्तिमत्व मा. धनाजी नाटेकर यांचा वाढदिवस जल्लोषात; कोळी समाज बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव

वळसंगचे लोकप्रिय व्यक्तिमत्व मा. धनाजी नाटेकर यांचा वाढदिवस जल्लोषात; कोळी समाज बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

प्रतिनिधी : वळसंग
वळसंग येथील कोळी समाजाचे खंबीर नेतृत्व आणि कोळी समाज उपाध्यक्ष मा.धनाजी नाटेकर यांचा वाढदिवस आज वळसंगमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्याचा वारसा जपणाऱ्या नाटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

धनाजी नाटेकर यांनी नेहमीच कोळी समाजाच्या उन्नतीसाठी आणि सामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाण्यासाठी पुढाकार घेतला आहे.त्यांच्या याच संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे वळसंग परिसरात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच समाजातील जेष्ठ नागरिक,युवक आणि ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.वाढदिवसाचे औचित्य साधून कोळी समाज बांधवांनी आणि नाटेकर समर्थकांनी वळसंगमध्ये विविध उपक्रम राबवले.ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावून लाडक्या नेतृत्वाचा गौरव करण्यात आला.

यावेळी कोळी समाजातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button