वळसंग ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर पाण्याचा हौद कोरडा,मुक्या जनावरांची पाण्यासाठी वणवण
वळसंग ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर पाण्याचा हौद कोरडा,मुक्या जनावरांची पाण्यासाठी वणवण
वळसंग (प्रतिनिधी) : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेला हौद सध्या कोरडा पडला असून,कडक उन्हामुळे जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.या गंभीर समस्येकडे वळसंग ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिक पशुपालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वळसंग आणि परिसरातील शेतकरी उपचारासाठी आपली जनावरे येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन येतात. या जनावरांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून दवाखान्यासमोर हौद बांधण्यात आला आहे.मात्र, सध्या हा हौद कोरडा ठाक पडला आहे.वाढत्या उष्णतेमुळे जनावरांना पाण्याची मोठी गरज असताना,हक्काच्या ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्याने पशुपालकांची मोठी ओढाताण होत आहे.
गावातील विकासकामांचा दावा करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला दवाखान्यासमोरील या रिकाम्या हौदाचा विसर पडला आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत मुक्या प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न हा माणुसकीचा विषय असून, ग्रामपंचायतीने तातडीने या हौदात पाण्याची सोय करणे आवश्यक आहे.पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभागाने आणि ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात पशुपालक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
७८७५९०३७७७.

