Maharashtra

खडकी वाहतूक शाखेत नितीन कारले यांची हवालदारपदी नियुक्ती; दंडापेक्षा जनजागृतीवर भर

खडकी वाहतूक शाखेत नितीन कारले यांची हवालदारपदी नियुक्ती; दंडापेक्षा जनजागृतीवर भर

पुणे, १ मार्च २०२६ – पुणे शहर पोलिसांच्या खडकी वाहतूक शाखेत नितीन बाळासाहेब कारले यांची पोलीस हवालदार पदावर नियुक्ती झाली आहे. एसीबी आणि पुणे पोलिस दलातील विविध विभागांत कर्तव्य सांभाळलेल्या कारले यांच्या प्रामाणिकपणा व शिस्तीमुळे ही जबाबदारी सोपवली गेली.नियुक्तीनंतर बोलताना कारले म्हणाले, “वाहतूक नियमांचे पालन नागरिकांची जबाबदारी आहे. दंड हा शेवटचा पर्याय; जनजागृती हा मुख्य उद्देश असेल. हेल्मेट, सीटबेल्ट, सिग्नल पालनावर मोहिमा राबवल्या जातील.”खडकीतील वाढती वाहनसंख्या व कोंडी लक्षात घेता त्यांच्या धोरणाने वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. सर्वस्तरातून त्यांचं अभिनंदन होत असून, शिस्तबद्ध व सुरक्षित वाहतुकीसाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button