Maharashtra

तीस लाखांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक ; शिक्षण संस्थेच्या संचालिकेविरुद्ध गुन्हा दाखल

तीस लाखांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक ; शिक्षण संस्थेच्या संचालिकेविरुद्ध गुन्हा दाखल;
सोयगाव ;दि. 25/03/26

नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तब्बल 30 लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात शिक्षण संस्थेच्या संचालिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातारा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 170/2026 नुसार, आरोपी संगिता बाळासाहेब आव्हाळे (रा. छत्रपतीनगर, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्यादी विष्णु गवाजी शहाणे (वय 58, रा. हरिज्योती पार्क, म्हाडा लेआउट, छत्रपती संभाजीनगर) यांची ओळख करून विश्वास संपादन केला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2012 ते 10 ऑक्टोबर 2018 या कालावधीत ज्ञानसुदा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कै. बाळासाहेब पाटील निवासी मुकबधिर विद्यालय, सातारा परिसर येथे फिर्यादीच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. तसेच फिर्यादीमार्फत इतर व्यक्तींनाही नोकरी मिळवून देण्याचे सांगत रोख रक्कम स्वीकारण्यात आली.

या दरम्यान आरोपीने संस्थेच्या कामासाठी लोकांकडून उसने घेतलेली रक्कमही फिर्यादीमार्फत घेतली. अशा प्रकारे एकूण 30 लाख रुपये स्वीकारून आरोपीने फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीने यापूर्वी तक्रार अर्ज दिल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या परवानगीने 23 मार्च 2026 रोजी रात्री 10.55 वाजता सातारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत असून पुढील तपास सुरू आहे.

पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button