टाकळीभानचे ग्रामदैवत महादेव यात्रौत्सव वर्गणीचा नारळ फोडून शुभारंभ.
महादेव यात्रौत्सव वर्गणीचा नारळ फोडून शुभारंभ.

टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणार्या शंभू महादेवाच्या यात्रौत्सवाच्या वर्गणीचा शुभारंभ सोमवार दि.३० मार्च रोजी महादेवास नारळ अर्पण करून करण्यात आला. यावेळी यात्रा कमिटी व ग्रामस्थांची छोटेखाणी बैठक पार पडली. यामध्ये जास्तीत जास्त वर्गणी ग्रामस्थांनी जमा करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.
सालाबादप्रमाणे या वर्षीही टाकळीभानसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणार्या शंभू महादेवाचा यात्रौत्सव दि.२० व २१ रोजी पार पडणार आहे. बहारदार आॅर्केस्टा, लोकनाट्य तमाशा, कुस्त्यांचा हगामा आदीसह इतर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन या यात्रौत्सवात केले जाते. मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच पै—पाहुणे यात्रौत्सवास हजेरी लावत असल्याने यात्रेचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याच अनूषंगाने यात्रौत्सव मोठ्या दिमाखात व शांततेत पार पडावा या अनूषंगाने सोमवार दि. ३० मार्च रोजी सकाळी ९ वा. महादेव मंदीराच्या प्रांगणात ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंभू महादेवाला नारळ अर्पण करून वर्गणीस प्रारंभ करण्यात आला. ग्रामस्थांनी सढळ हाताने जास्तीत जास्त वर्गणी देवून यात्रा कमिटीस सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी राजेंद्र कोकणे, मंजाबापू थोरात, गजानन कोकणे, बापूसाहेब शिंदे, शिवाजीराव शिंदे, लक्ष्मण सटाले, प्रा.जयकर मगर, पत्रकार चंद्रकांत लांडगे, संदीप बोडखे, पाराजी पटारे, अमोल पटारे, विशाल पटारे, काकासाहेब डिके, अनिल बोडखे, सुनिल बोडखे, भाऊराव कोकणे, सुरेश पवार, मधूकर गायकवाड, आबासाहेब रणनवरे, अनिल कोकणे, नितिन पटारे, रंगनाथ कोकणे, बंडोपंत बोडखे, रोहीदास पटारे, प्रा.कार्लस साठे, बबनराव मगर, संजय रणनवरे, रत्नाकर रणनवरे, बाबा पांडे, गोरख कोकणे, कृष्णा वेताळ, बंडू वेताळ, दत्तात्रय मगर, खंडेराव गवांदे, राजेंद्र देवळालकर आदीसह सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ भाविक भक्त यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर
