Maharashtra

शनिवार वाड्यात महिला शौचालय बंद पर्यटकांचे हाल; महिलांकडून फी घेण्यावरही प्रश्न

शनिवार वाड्यात महिला शौचालय बंद पर्यटकांचे हाल; महिलांकडून फी घेण्यावरही प्रश्न

पुणे : शनिवार वाडा परिसरातील महिला शौचालय बंद असल्यामुळे महिला पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात; मात्र मूलभूत सुविधा बंद असल्याने महिलांची गैरसोय होत आहे.
येथे भेट देण्यासाठी आलेल्या एका महिला पर्यटकाने सांगितले की, आज दुपारी सुमारे ४ वाजल्यापासून हे महिला शौचालय बंद आहे. शौचालयाच्या दरवाजावर “वापरासाठी ५ रुपये शुल्क” असे लिहिलेले असूनही ते प्रत्यक्षात बंद असल्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पर्यटकांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची सोय ही मूलभूत गरज असून त्यासाठी कोणताही शुल्क आकारू नये, अशीही मागणी करण्यात येत आहे. पर्यटनस्थळावर महिलांसाठी स्वच्छ व विनामूल्य शौचालय उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही पर्यटकांनी नमूद केले.
संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन महिला शौचालय सुरू करावे, स्वच्छता व देखभाल नियमित ठेवावी आणि महिलांकडून कोणतीही फी आकारू नये, अशी मागणी केली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button