Maharashtra

शेड्याळमध्ये थरार! जुन्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला;जत पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शेड्याळमध्ये थरार! जुन्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला;जत पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेड्याळ येथे जुन्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले असून,दगड,काठी आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी जत पोलिसांनी तत्परता दाखवत चौघा संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

सदर मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी सुरेश मडाप्पा हावगोंडी (वय २७) हे शेड्याळ येथे नाटक पाहण्यासाठी थांबले होते.पहाटे ४ वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांना स्वप्नील केंगार यांच्या दुकानासमोर गाठले. काहीही विचारण्यापूर्वीच आरोपींनी सुरेश यांच्यावर दगड आणि काठीने हल्ला चढवला.हा हल्ला इतका भीषण होता की,मुख्य हल्ल्यानंतरही आरोपींचे समाधान झाले नाही.त्यांनी सुरेश यांचा त्यांच्या घरापर्यंत पाठलाग केला. तिथे सुरेश यांचे पुतणे आकाश म्हाळाप्पा हावगोंडी आणि सुभाष आप्पासो हावगोंडी हे वाचवण्यासाठी आले असता, त्यांनाही आरोपींनी काठीने बेदम मारहाण केली.

यामध्ये तिघांच्याही छातीवर,पाठीवर आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे.जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार मारहाणीदरम्यान आरडाओरडा झाल्याने नागरिक जमा होऊ लागताच,आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करत “जीवे मारू” अशी धमकी दिली आणि तिथून पळ काढला.

जत पोलिसांनी याप्रकरणी सुखदेव कल्लाप्पा हावगोंडी,अजित सुखदेव हावगोंडी,आकाश सुखदेव हावगोंडी,राजू महादेव गुगवाड (सर्व रा. शेड्याळ) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेमुळे शेड्याळ परिसरात तणावाचे वातावरण असून,पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
७८७५९०३७७७.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button