सांगवी–पिंपळे गुरव प्रशिक्षण वर्गात महामंत्री मधुकर बच्चे यांचे मार्गदर्शन

सांगवी–पिंपळे गुरव प्रशिक्षण वर्गात महामंत्री मधुकर बच्चे यांचे मार्गदर्शन
सांगवी – पिंपळे गुरव भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत सांगवी–पिंपळे गुरव मंडलाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. या प्रशिक्षण वर्गात मधुकर बच्चे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी बूथ सक्षमीकरण व ‘मन की बात’ या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर माहिती दिली. बूथ स्तर मजबूत असेल तरच पक्षाची संघटना अधिक सक्षम होते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ‘मन की बात’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना व उपक्रम सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रसेवा, सुशासन आणि समाजहिताच्या मूल्यांवर कार्य करणारी संघटना असून, प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रिय राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास व संघटन कौशल्य वाढते, असेही त्यांनी नमूद केले.
मंडलाध्यक्ष श्री. गणेश ढोरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन केले होते. या कार्यक्रमास मंडलातील नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच शक्ती प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


