Maharashtra

सण-उत्सव काळात होमगार्डचे पोलिसांना मोठे सहकार्य – स.पो.नि. संतोष माने.

पारध (महेंद्र बेराड, भोकरदन तालुका प्रतिनिधी):

सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्ड जवान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करतात, ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मत पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी व्यक्त केले.

पारध येथे पदोन्नती झालेल्या होमगार्ड जवानांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. भोकरदन व पारध पोलीस ठाण्यात कार्यरत सहा होमगार्ड जवानांना जिल्हा समादेशक होमगार्ड, जालना तथा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात आली आहे.

यामध्ये भोकरदन पोलीस ठाण्यातील समाधान दसपुते यांची कंपनी कमांडर, शेख तन्वीर व शेख जमील यांची पलटन नायक म्हणून पदोन्नती करण्यात आली. तसेच पारध पोलीस ठाण्यातील होमगार्ड राजकुमार लोखंडे व समाधान सुरडकर यांची विभाग नायक, तर राजेंद्र लोखंडे यांची नायक पदावर पदोन्नती झाली आहे.

या पदोन्नतीनिमित्त गुरुवार (दि. १२) रोजी पारध पोलीस ठाण्याच्या वतीने संबंधित होमगार्ड जवानांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स.पो.नि. संतोष माने होते, तर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी लोखंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन करताना रवी लोखंडे यांनी होमगार्ड जवानांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस कॉन्स्टेबल भगवान जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन होमगार्ड संतोष तबडे यांनी केले.

यावेळी सेवानिवृत्त होमगार्ड बबन लोखंडे, साहेबराव सुरडकर, आर. बी. लोखंडे, विश्वास लोखंडे, कैलास तबडे, दिलीप तबडे, प्रशांत सपकाळ, रणजीत तबडे, सागर लोखंडे, अमोल गाढवे आदी होमगार्ड उपस्थित होते.

प्रतिनिधी: महेंद्र बेराड भोकरदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button