Maharashtra

सामाजिक कार्यासाठी श्रीमती सिथिया सायमन कोरिया यांना “जोगेश्वरीचा रणरागिणी” पुरस्कार .

सामाजिक कार्यासाठी श्रीमती सिथिया सायमन कोरिया यांना “जोगेश्वरीचा रणरागिणी” पुरस्कार

.जळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शामनगर (शामनगरचा राजा मंडळ) यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमती सिथिया सायमन कोरिया यांना “जोगेश्वरीचा रणरागिणी” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसताना त्यांनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. घरातील परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांची तसेच बहिणीची जबाबदारी खांद्यावर घेत समाजसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे.
कठीण परिस्थितीतही समाजासाठी सातत्याने झटणाऱ्या या कर्तृत्ववान महिलेच्या कार्याची दखल घेत सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शामनगर यांच्या वतीने त्यांना “जोगेश्वरीचा रणरागिणी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या कार्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिमान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button