Maharashtra

*रामनगर (चौरीवाडी)पारध शाहूराजे येथे संत शिरोमणी राष्ट्रसंत श्री रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी*

*रामनगर (चौरीवाडी)पारध शाहूराजे येथे संत शिरोमणी राष्ट्रसंत श्री रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी*

पारध ( श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी): रामनगर (चौरीवाडी) येथे बारी समाजाचे आराध्य दैवत,आई नागवेली पुत्र राष्ट्रसंत श्री रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास बारी समाज बांधवा सोबतच गावातील इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला, पुरुष ,भजनी मंडळी तसेच लहान मुले मोठ्या श्रद्धेने सहभागी झाली होती.

कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी रुपलाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांचा जागर करून समाजात एकजूट, संस्कृती आणि अध्यात्म यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तांनी “ संत रुपलाल महाराजांचा जयजयकार” करत संपूर्ण परिसर भक्तिमय केला.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे भोकरदन तालुका उपाध्यक्ष श्री महेंद्र बेराड सर, महासंघाचे भोकरदन तालुका सहसचिव तथा ग्रामपंचायत सदस्य श्री बबलू तेलंग्रे,सुखदेव भुते, गणेश तेलंग्रे, बबन भुते, रामदास भुते,विठ्ठल बेराड, माधव बेराड, रेवन कोथलकर, बबन कोथलकर,पवन बेराड, प्रकाश भुते,संजय कोथलकर, अमोल भुते, सतीश कोथलकर, हर्षल शिनकर, गोपाल बेराड , रेवन भुते, कृष्णा भुते व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बारी समाजातील महिला वर्ग व बालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सर्व उपस्थितांनी सहभागी होत प्रसादाचा लाभ घेतला.

दरम्यान, रामनगर (चौरीवाडी)येथे दरवर्षीप्रमाणे श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, त्याच अनुषंगाने दिनांक 23 मार्च 2026 बुधवार रोजी हा पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button