राजधानी रायगडावर भोसरीतील धर्मवीर ट्रेकर्स संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम अभियान

राजधानी रायगडावर भोसरीतील धर्मवीर ट्रेकर्स संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम अभियान
“माझा गड माझी जबाबदारी” या घोषवाक्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवत भोसरी मधील धर्मवीर ट्रेकर्स संस्थेच्या वतीने ऐतिहासिक किल्ले रायगडावर भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.मोहिमेची सुरुवात पाचाड येथील जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधी स्थळाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, स्वच्छता मोहिमेत संस्थेचे सदस्य व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
अभियानादरम्यान किल्ला परिसरातील प्लास्टिक, कागद व इतर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच पर्यटकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्याचे आवाहन करण्यात आले. “आपला ऐतिहासिक वारसा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमामुळे रायगड परिसर अधिक स्वच्छ व सुशोभित झाला असून स्थानिक नागरिक व पर्यटकांनी धर्मवीर ट्रेकर्स संस्थेच्या कार्याचे स्थानिकांनी कौतुक केले.स्वच्छता मोहिमेत विनय दुराफे, विवेक वामने, सुधीर शेडगे, स्वप्निल बोडके, कुणाल वाळुंज,अविनाश गायकवाड,गणेश गावले, गणेश गायकवाड,सुबोध वामने,अमेय गावले,ओंकार सहित बाल चमुंनी देखील सहभाग घेतला,भविष्यातही असे सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार संस्थेचे अध्यक्ष रवि गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रतिनिधी विजय अडसूळ

