Maharashtra

पार्ले स्पोर्ट्स क्लबचा दिमाखदार विश्वविक्रम; महिलांच्या सात थरांची ऐतिहासिक कामगिरी

पार्ले स्पोर्ट्स क्लबचा दिमाखदार विश्वविक्रम; महिलांच्या सात थरांची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई, २१ मार्च २०२६ : पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या महिला दहीहंडी पथकाने सात थरांची मानवी मीनार रचत विश्वविक्रम नोंदवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ने घेतली असून पथकाला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.
हिंदू नववर्षानिमित्त विलेपार्ले येथे आयोजित भव्य शोभायात्रेत पार्लेकर नागरिकांच्या साक्षीने हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी आमदार वरुण सरदेसाई (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आमदार संजय उपाध्याय (भाजपा) यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच जनसेवा समितीचे पदाधिकारी मिलिंद करमरकर आणि गिरीश कुलकर्णी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
“सर्वांच्या आशीर्वाद व सहकार्यामुळेच ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली. पुढील काळातही असेच प्रोत्साहन लाभावे,” असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सदस्य शिवाजी खैरनार यांनी केले.

प्रतिनिधी सिंथीया कोरिया

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button