Maharashtra

ओम गणेश सोसायटीत धुलीवंदनाचा जल्लोष

ओम गणेश सोसायटीत धुलीवंदनाचा जल्लोष

पुणे; ओम गणेश सोसायटी केशव नगर चिंचवडगाव येथे धुलीवंदन उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व रहिवाशांनी एकत्र येत रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
सकाळपासूनच सोसायटीच्या आवारात रंगांची उधळण, पारंपरिक गाणी यामुळे वातावरण रंगून गेले होते. मुलांसाठी विशेष खेळ आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी एकत्र येत पारंपरिक नृत्य सादर केले, तर युवकांनी जल्लोषात रंगांची उधळण केली.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरे करण्याचे आवाहन केले होते. केमिकल रंगांचा वापर टाळून सेंद्रिय रंगांचा उपयोग करण्यात आला.
एकात्मता, बंधुभाव आणि आनंदाचा संदेश देणारा हा धुलीवंदन उत्सव सर्वांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button