Maharashtra

नारायणगाव येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा

नारायणगाव येथे आंतरशालेय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा

सह्याद्री स्पोर्ट्स फाउंडेशन व ग्रामोन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर, नारायणगाव येथे होणार आहे.
या स्पर्धेत ६, ८, १०, १२ आणि १४ वर्षे वयोगटातील मुले व मुली सहभागी होणार असून विविध मैदानी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
६ वर्षे गटासाठी ५० मीटर धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप, ४×५० मीटर शटल रिले,
८ वर्षे गटासाठी ८० मीटर धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप, ४×५० मीटर शटल रिले,
१० वर्षे गटासाठी १०० मीटर धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप, ४×१०० मीटर रिले,
१२ वर्षे गटासाठी १०० मीटर व ३०० मीटर धावणे, १ किलो शॉटपुट, लांब उडी, ४×१०० मीटर रिले,
तर १४ वर्षे गटासाठी १०० मीटर व ४०० मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी व ४×१०० मीटर रिले असे क्रीडा प्रकार ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश फी प्रति खेळाडू १०० रुपये असून एका खेळाडूला दोन वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभागी होता येणार आहे. रिले स्पर्धेसाठी एका संघासाठी २०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.
प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रथम तीन विजेत्या खेळाडूंना मेडल, सर्टिफिकेट आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी प्रत्येक शाळेला सहभागी प्रमाणपत्र व चषक, तर सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी तुळशीदास कोऱ्हाळे (९९७५४९६७३७) व अंकुश शिंदे (९९७०६८५८२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button