Maharashtra
मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला; सरकारकडे मदतीची याचना
मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला; सरकारकडे मदतीची याचना
मुंबई : इराण–इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांतील हवाई सेवा विस्कळीत झाल्याने मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. लंडनला जाण्यासाठी निघालेले त्याचे विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आल्याने तो मागील काही दिवसांपासून तेथेच अडकून पडला आहे.
सध्या त्या भागात तणावपूर्ण परिस्थिती असून ड्रोन हल्ल्यांच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे.
“माझ्या मुलाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी मदत करावी,” अशी भावनिक विनंती त्यांनी केली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे



