Maharashtra

महाराष्ट्रातील शाळांना २ मेपासून १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर

महाराष्ट्रातील शाळांना २ मेपासून १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने राज्यभरातील बहुतांश शाळांसाठी २ मे २०२६ पासून १४ जून २०२६ पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस परीक्षा पूर्ण होताच विद्यार्थ्यांना तब्बल ४२ दिवसांची दीर्घ सुट्टी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात वाढत्या तापमानाचा विचार करून शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून
माहितीनुसार, नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून २०२६ पासून सुरू होणार असून, काही भागांमध्ये विशेषतः विदर्भात शाळा सुरू होण्यास थोडा उशीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खासगी तसेच CBSE आणि ICSE शाळांना त्यांच्या सोयीने सुट्ट्यांच्या तारखा ठरवण्याची मुभा देण्यात आली आहे.
विद्यार्थी-पालकांमध्ये आनंदाची लहर
सुट्टी जाहीर होताच विद्यार्थ्यांनी गावी जाणे, सहलींचे नियोजन, तसेच विविध छंद जोपासण्याचे प्लॅन आखायला सुरुवात केली आहे. पालकांनाही मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button