महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीचा ५ मार्चपासून बेमुदत संप
महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीचा ५ मार्चपासून बेमुदत संप
ई-चलानविरोधात राज्यभर चक्काजामपुणे: राज्यातील खासगी बस, रिक्षा, टॅक्सी, शाळा बस तसेच मालवाहतूकदारांनी ई-चलान प्रणालीविरोधात एकत्र येत ५ मार्चच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीने पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यव्यापी चक्काजामचा इशारा दिला आहे. ही घोषणा नवी मुंबईतील वाशी येथील राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आली.आंदोलनाची पार्श्वभूमीई-चलान प्रणालीमध्ये चुकीचे दंड आकारले जाणे, ५० टक्के आगाऊ रक्कम भरण्याची सक्ती, वाहन ब्लॅकलिस्टिंग आणि तक्रारींचे संथ निवारण यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. दुहेरी टोल, इंधन अधिभार, व ‘नो-एंट्री’ नियमांनाही तीव्र विरोध आहे. संघटनांनी या जाचक धोरणांमुळे उद्योग व्यवसाय धोक्यात आल्याचे सांगितले.प्रमुख मागण्याई-चलान प्रणालीतील त्रुटी दूर करून एकसमान पोर्टल तयार करावे; ५०% दंडाची सक्ती रद्द करावी.जाचक दंडवसुली थांबवून सर्व जुन्या दंडांचे माफी द्यावी.व्यावसायिक वाहनांसाठी नो-एंट्री, पार्किंग नियम व क्लीनर सक्ती रद्द करावी.तक्रारींसाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था उभारावी.संभाव्य परिणाम५ मार्चपासून मुंबईतील आजाद मैदान किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात १ ते १.५ लाख वाहने जमा होणार आहेत. शाळा बस, कंटेनर, एलपीजी टँकर व प्रवासी वाहतूक ठप्प होईल; शाळा, बाजारपेठा व दैनंदिन जीवन प्रभावित होईल. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्यास संप मागे घेण्याची तयारी आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
