Maharashtra

कुणिकोणूरच्या ‘गुरुकुल’चा नवोदय परीक्षेत डंका; दोन विद्यार्थ्यांची गरुड झेप!

कुणिकोणूरच्या ‘गुरुकुल’चा नवोदय परीक्षेत डंका; दोन विद्यार्थ्यांची गरुड झेप!

कुणिकोणूर (ता. जत) | १८ मार्च २०२६ : जत तालुक्यातील कुणिकोणूर येथील गुरुकुल विद्यामंदिर प्रशालेने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेच्या निकालात या प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत नवोदय विद्यालयासाठी आपली निवड निश्चित केली आहे.

या परीक्षेत प्रशालेचे दोन गुणवंत विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांची ‘पलूस’ येथील नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. यामध्ये कुमार.कार्तिक अविनाश गडदे – याने ९७.५०% गुण मिळवून घवघवीत यश मिळवले. तर कुमारी.आरोही श्रीकांत कांबळे – हिने ९६.२५% गुण मिळवून आपली चमक दाखवली.

या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री.अस्लम शेख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश शक्य झाले असल्याचे बोलले जात आहे.

या यशाबद्दल प्रशालेचे संस्थापक व मुख्याध्यापक श्री.एम.एन.नरळे (सर) यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे ‘हार्दिक अभिनंदन’ केले आहे.

या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने नवोदय सारख्या प्रतिष्ठित परीक्षेत यश मिळवल्याने संपूर्ण जत तालुक्यात आणि कुणिकोणूर परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.जतसारख्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली ही गरुड झेप इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
७८७५९०३७७७.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button