Maharashtra

कळमनुरी गार्डनमध्ये भीषण आग; खेळाचे साहित्य जळून खाक, नागरिकांची तात्काळ दुरुस्तीची मागणी;

कळमनुरी गार्डनमध्ये भीषण आग; खेळाचे साहित्य जळून खाक, नागरिकांची तात्काळ दुरुस्तीची मागणी;

जि. हिंगोली. ता. (कळमनुरी);
येथील गार्डनमध्ये रविवारी (२२ मार्च) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आग इतकी तीव्र होती की काही क्षणांतच गार्डनमधील गवत, पाण्याची पाइपलाईन, प्लास्टिकचे खेळाचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक वायरिंग, तसेच सिमेंट व लोखंडी खुर्चा, झुले आदी साहित्य जळून खाक झाले आग लागल्याची माहिती मिळताच नगरपालिकेचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने ती लगेच आटोक्यात आली नाही.

त्यानंतर अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. तोपर्यंत गार्डनचा अर्ध्याहून अधिक भाग जळून झाला होता. या आग विझवण्यासाठी पालिकेचे कर्मचारी मनोज नखवाल, राहुल इंगळे, प्रमोद जाधव, प्रभू लांडगे ,आणि मिलिंद पाईकराव यांनी विशेष प्रयत्न केले. दरम्यान, कळमनुरीतील हे उद्यान मागील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून त्याची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. लहान मुलांसाठी असलेले झुले आधीपासूनच तुटलेले होते. काही मौल्यवान साहित्य चोरीस गेल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर गार्डनची दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button