Maharashtra
किरकोळ भांडणातून दुसऱ्या मजल्यावरून ढकलले, मजुराचा मृत्यू;
किरकोळ भांडणातून दुसऱ्या मजल्यावरून ढकलले, मजुराचा मृत्यू;
पुणे.दि.31/03/2026
चिंचवड येथील वाल्हेरकरवाडी येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. केशवकुमार महतो असे मयत मजुराचे तर पुनीत राम नक्षत्र शुक्ला असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
महतो हा मूळचा बिहारचा असून कामानिमित्त चिखलीतील अष्टविनायक चौक येथे राहत होता. आरोपी आणि मयत दोघेही घर दुरुस्तीच्या कामासाठी आले होते. यावेळी दोघांमध्ये काही कारणातून भांडण झाले. याच भांडणातून पुनीतने केशवकुमारला दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यात केशवकुमारचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी पुनीत घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.
पत्रकार : विजय रणभोर पुणे.
