Maharashtra
खर्डी येथे २४ मार्च रोजी तालुका स्तरीय महा आरोग्य शिबिर; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
खर्डी येथे तालुका स्तरीय महा आरोग्य शिबिर; नागरिकांनी लाभ घ्यावा
प्रशासनाचे आवाहन शहापूर तालुक्यातील खर्डी येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर २४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मोफत औषधोपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रतिनिधी : विजय रणभोर

