Maharashtra

जतमध्ये ७ ते ९ मार्च दरम्यान ‘जिल्हास्तरीय भव्य कृषि महोत्सव २०२६’ चा जागर.

जतमध्ये ७ ते ९ मार्च दरम्यान ‘जिल्हास्तरीय भव्य कृषि महोत्सव २०२६’ चा जागर.

वळसंग (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन कृषी विभाग,उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय,जत यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी ‘जिल्हास्तरीय भव्य कृषि महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.हा महोत्सव शनिवार, ७ मार्च ते सोमवार,९ मार्च २०२६ या कालावधीत जत येथील महाराणा प्रताप चौक, एस.टी. स्टँड जवळ, जत सिड फार्म येथे पार पडणार आहे.

या भव्य कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमदार मा.श्री.गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी सांगलीचे जिल्हाधिकारी मा.श्री.अशोक काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून,कृषी क्षेत्रातील मान्यवर अधिकारी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या महोत्सवात दररोज विविध विषयांवर चर्चासत्रे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.७ मार्च शनिवार श्री.बी.जे. पाटील यांचे ‘द्राक्ष पिकावरील छाटणी व्यवस्थापन आणि नवीन वाण परिसंवाद’ या विषयावर व्याख्यान होईल.

दि.८ मार्च रविवार ‘जागतिक महिला दिना’निमित्त महिला मेळावा आयोजित केला आहे.श्रीमती सुषमा पाटील ‘महिला आत्मनिर्भरता व सेंद्रिय शेती’वर मार्गदर्शन करतील.तसेच महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ आणि ‘पाककला स्पर्धा’ पार पडेल.पाककला स्पर्धेसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत नाव नोंदणी आवश्यक असून विजेत्यांना पैठणीसह आकर्षक बक्षिसे दिली जातील.

दि.९ मार्च सोमवार ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (शक्ती धान्य)’ अंतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाची मुख्य आकर्षणे

एक- प्रगत तंत्रज्ञान शेतीमध्ये ‘ए.आय.'(AI) आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापराचे प्रदर्शन.

दोन- थेट विक्री शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांची दालने.

तीन -शासकीय योजना विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्वतंत्र दालन सुविधा माती व पाणी परीक्षण सुविधा आणि प्रगत शेती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोली,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार,प्रकल्प संचालक (आत्मा) अभयकुमार चव्हाण आणि उपविभागीय कृषी अधिकारी,जत यांच्या मार्गदर्शनाखाली जत व कवठेमहांकाळ येथील तालुका कृषी अधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.

जत परिसरातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.७८७५९०३७७७.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button