Maharashtra

जळगावहून सतनासाठी निघालेला तरुण बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू

जळगावहून सतनासाठी निघालेला तरुण बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू

देवेंद्र सिंग प्रेमलाल सिंग चौहान (वय ३२, रा. साईनगर एमआयडीसी, जळगाव) हा तरुण सतनासाठी निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून शोधकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र सिंग प्रेमलालसिंग चौहान हे गेल्या १० ते १२ वर्षांपासून जळगाव येथे वास्तव्यास असून एमआयडीसी परिसरात किराणा दुकान चालवतात.
दिनांक ८ मार्च २०२६ रोजी देवेंद्र सिंग चौहान हे जळगाव रेल्वे स्थानकावरून ट्रेन क्रमांक १५१८२ एलटीटी–महू साप्ताहिक एक्सप्रेसच्या जनरल डब्यात बसून सतनासाठी रवाना झाले. मात्र ते घरी पोहोचले नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच इतर ठिकाणी शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन असे: उंची सुमारे ५ फूट, सडपातळ शरीरयष्टी, गोरा रंग, लांब चेहरा, काळे केस, सरळ नाक, पातळ दाढी-मिशा. अंगावर तपकिरी टी-शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट होती. त्यांना हिंदी भाषा अवगत आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात, संबंधित व्यक्ती शेवटच्या रेल्वे स्टेशनवर उतरला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी सुमेश मुळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button