जिल्हा परिषद अध्यक्षांनी टाळला जल्लोषाचा गुलाल
जिल्हा परिषद अध्यक्षांनी टाळला जल्लोषाचा गुलाल
दौंड, ता. २० : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होऊनही वीरधवल जगदाळे यांनी जल्लोषाचा गुलाल टाळत साधेपणाचा आदर्श घालून दिला. खडकी-देऊळगाव राजे गटातून विजयी झाल्यानंतरही त्यांनी दिवंगत अजित पवार यांना आदरांजली म्हणून तेव्हाही गुलाल स्वीकारला नव्हता.
अध्यक्षपदी निवडीनंतर जगदाळे यांनी मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व माजी मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विशेष सभेनंतर ते थेट बारामती येथे जाऊन दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली.
दौंड येथे आगमनानंतरही त्यांनी कोणतीही मिरवणूक न काढता पायी जात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. मार्गात भेटलेल्या नागरिक व मतदारांचे त्यांनी साधेपणाने अभिनंदन स्वीकारले.
— पत्रकार विजय रणभोर
