Maharashtra

जागतिक महिला दिनानिमित्त संत सेना महाराज महिला मंडळाचा प्रेरणादायी कार्यक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त संत सेना महाराज महिला मंडळाचा प्रेरणादायी कार्यक्रम

भोसरी : ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त भोसरी येथील संत सेना महाराज मंदिर येथे संत सेना महाराज महिला मंडळाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. स्नेहाताई निलेश गायकवाड या होत्या, तर कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. मोहिनीताई आशिष उरकुडकर यांनी केले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर महिलांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये ॲड. लक्ष्मीताई सावंत, मुक्ताई भजनी मंडळाच्या सौ. लताताई शिनकर, महाराष्ट्र परिवहन मंडळ (पुणे-राजगुरुनगर) येथे कार्यरत सौ. लांडे मॅडम, महानगरपालिका हॉस्पिटल भोसरी येथे कार्यरत सौ. वैशालीताई पाटील व सौ. पूनमताई बिडवे यांचा समावेश होता.
तसेच चंद्रभागा भीष्म गायकवाड, सौ. पुष्पाताई भालेकर, सौ. मंदाताई घायतडक, सौ. छायाताई जाधव, सौ. रेश्माताई पंडित, सौ. राणीताई पंडित, निर्मिती हॉस्पिटल मोशी येथे कार्यरत प्रमिलाताई भालेकर, उत्कृष्ट फोटोग्राफर सौ. उषाताई भटकर, सौ. अर्चनाताई पंडित, अर्जुन पाटील व सोहम पंडित यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
महिलांच्या सन्मानासाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी संत सेना महाराज महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे संत सेना महाराज महिला मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

प्रतिनिधी विजय अडसूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button