Maharashtra

हुंड्यासाठी छळ: जतमध्ये विवाहितेचे ६ तोळे दागिने लाटले; सासरच्या पाच जणांवर गुन्हा

हुंड्यासाठी छळ: जतमध्ये विवाहितेचे ६ तोळे दागिने लाटले; सासरच्या पाच जणांवर गुन्हासंख येथील विवाहितेची पोलिसांत धाव; पतीकडून जिवंत मारण्याची धमकी

जत (प्रतिनिधी) : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने जत पोलीस ठाण्यात धाव घेत पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.माहेरून लग्नात मिळालेले ६ तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेणे आणि सतत शारीरिक व मानसिक मारहाण करणे,असे गंभीर आरोप पीडितेने केले आहेत.

याप्रकरणी गिरीजा राजेंद्र पाटील (वय ३६, मूळ रा.संख सध्या अंबिकानगर,जत) यांनी फिर्याद दिली असून,पोलिसांनी पती राजेंद्र आप्पासाहेब पाटील,सासू सरुबाई (शांता) पाटील,नणंद सुजाता मल्लिकार्जुन बिराजदार,नणंदेचा पती मल्लिकार्जुन बिराजदार आणि नातेवाईक विजय हणमंतराय बिराजदार (सर्व रा. संख) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

सदर तक्रारीनुसार,एप्रिल २०२५ मध्ये पीडितेने पतीला सोबत नेण्याचा प्रयत्न केला असता,नातेवाईक विजय बिराजदार याने त्यांना व त्यांच्या चालकाला मारहाण केली.यावेळी पती राजेंद्र पाटील याने “तू येथे राहिलीस तर तुला जिवंत पेटवून देईन”, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
७८७५९०३७७७.


 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button