Maharashtra

ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्याला यश; ३० मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा होणार;

ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्याला यश; ३० मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा होणार;

श्रीगोंदा (प्रतिनिधी): तालुक्यातील ग्राहक पंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, श्रीगोंदा तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन दिनांक ३० मार्च २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार सचिन डोंगरे यांनी अधिकृत माहिती दिली आहे
दरवर्षी National Consumer Day (२४ डिसेंबर) व World Consumer Rights Day (१५ मार्च) हे दिवस महाराष्ट्र शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात साजरे करणे अपेक्षित असते. मात्र, यंदा १५ मार्च रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा न झाल्याने ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या बाबीची दखल घेत तहसील प्रशासनाने आता दिनांक ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता श्रीगोंदा तहसील कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याबाबत पत्र देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी जितेंद्र पितळे यांनी दिली.

या निर्णयामुळे ग्राहक हक्कांविषयी जनजागृती होण्यास मदत होणार असून, ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्याचे हे यश मानले जात आहे.
पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button