गॅसचा तुटवड्या नागरिक त्रस्त; पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त; पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
जळगाव : शहरात सध्या LPG गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. आज ईच्छादेवी परिसरातील LPG गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ईच्छादेवी ते मेहरूण वखार परिसरातील पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालकांना गॅस भरण्यासाठी किमान चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
LPG गॅसचा तुटवडा आणि सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जळगाव शहरात LPG गॅस पंपांची संख्या केवळ दोन ते तीन असल्याने उपलब्ध पंपांवर गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
या परिस्थितीचा परिणाम ऑटो रिक्षा सेवांवरही होत असून काही ठिकाणी रिक्षा भाड्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहें
प्रतिनिधी सोमेश मूळे

