Maharashtra

चिंचवडमध्ये वुई टुगेदर फाउंडेशनचा महिला सन्मान कार्यक्रम उत्साहात

चिंचवडमध्ये वुई टुगेदर फाउंडेशनचा महिला सन्मान कार्यक्रम उत्साहात

वुई टुगेदर फाउंडेशन वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध महिलांचा सन्मान समारंभ काशीधाम मंगल कार्यालय चिंचवड येथे संपन्न झाला
जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांचा सन्मान, महिला प्रबोधन तसेच नेत्र आरोग्याची माहिती असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाला समाज प्रबोधनकार सौ शारदाताई मुंडे या प्रमुख वक्त्या होत्या
ईशा नेत्रालय चिंचवड स्टेशन या नेत्र रुग्णालयाच्या सेंटर हेड ध्रुवशी पाटील, वरिष्ठ नेत्र सर्जन डॉ.रश्मी लोंढे तसेच पुणे जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी मनीषा माळी या पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
वुई टुगेदर अध्यक्ष मधुकर बच्चे हे अध्यक्षस्थानी होते
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव मंगला डोळे -सपकाळे यांनी केले व पाहुण्यांची ओळख संस्थेच्या महिला समन्वयक अपर्णाताई कुलकर्णी यांनी करून दिली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव जयंत कुलकर्णी यांनी केले
संस्थेने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा दिला तसेच येणाऱ्या दिवसात संस्थेचे कार्यक्रम व त्याविषयी संस्था करत असलेली माहिती दिली संस्थेतर्फे गरजू मुलांना शैक्षणिक सहायता निधीचे वाटप, बिगारी काम करणाऱ्यांना आवश्यक मदत घरकाम करणाऱ्या महिलांना वेळोवेळी आवश्यक ती मदत विधवा महिलांना कायमच शक्य ते सहकार्य दिव्यांगांसाठी विशेष भरीव कार्य, विविध क्षेत्रातील गरजूंना नेहमी फाउंडेशन तर्फे निस्वार्थी मदतीचा हात पुढे करीत कार्य अविरत सुरू असल्याचे नमूद केले.
आत्तापर्यंत वुई टुगेदर फाउंडेशनच्या शिफारशीने समाजातील अनेक गरजू रुग्णांना डोळ्यांविषयी अनेक प्रकारची मदत केल्याबद्दल फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी ईशा नेत्रालयाचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला भगिनींचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष
मधुकर बच्चे,उपाध्यक्ष रवींद्र काळे सचिव जयंत कुलकर्णी सहसचिव मंगला डोळे सपकाळे खजिनदार दिलीप चक्रे सल्लागार रवींद्र सागडे खुशाल दुसाने महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी ज्येष्ठ मार्गदर्शक सलीम सय्यद आदींनी या उपक्रमात पुढाकार घेतला
अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात वुई टुगेदर फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती दिली फाउंडेशन च्या वतीने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो म्हणजेच प्रत्येक वेळेस विविध क्षेत्रातील महिला असतात यावेळी शंभरहून अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला
महिलांना पुढेही असेच सहकार्य राहील असे आश्वासित केले.
गिरी सिस्टर्स या नावाने परिचित असणाऱ्या व रुग्णांना ॲम्बुलन्स चालक म्हणून सेवा पुरविणाऱ्या दोन्ही गिरी भगिनींचा व शिवछत्रपती पुरस्कार विजेती दिव्यांग खेळाडू वैष्णवी जगताप हिचा विशेष सन्मान करण्यात आला .
प्रमुख वक्त्या शारदाताई मुंडे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सर्व महिला भगिनींचे प्रबोधन केले तसेच प्रमुख पाहुण्या ईशा नेत्रालयाच्या सेंटर हेड ध्रुवशी पाटील यांनी ईशा नेत्रालयातर्फे गरजूंना मदत विषयी सविस्तर माहिती दिली.
ईशा नेत्रालयाच्या ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ रश्मी लोंढे यांनी पन्नाशीनंतर डोळ्याचे आरोग्य कसे जपावे याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच दुसऱ्या पाहुण्या मनीषा माळी यांनी खेळाविषयी माहिती दिली तसेच त्यांनी स्वतः भारताचे प्रतिनिधित्व ऑलिंपिक मध्ये केलेले आहे या प्रवासातील त्यांनी आपले अनुभव उपस्थित महिलांना आवर्जून सांगितले
संस्थेचे खजिनदार दिलीप चक्रे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button