चाकण येथे राणूबाई माता यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

चाकण येथे राणूबाई माता यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
जि. पुणे, ता. खेड (चाकण) :
चाकण येथील ग्रामदैवत राणूबाई माता यांच्या यात्रा उत्सवानिमित्त यावर्षीही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
हा उत्सव दि. 23 व 24 मार्च 2026 रोजी दोन दिवस साजरा केला जाणार असून, चाकण परिसरात भक्तिमय वातावरण पसरले आहे. या कार्यक्रमांचा सर्व नागरिक व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार : विजय रणभोर



