बारी समाजाचे आधारस्तंभ स्व. डॉ. डी.डी. कोथळकर यांना बुलढाण्यात श्रद्धांजली सभा

बुलढाणा, दि. ४ मार्च : (महेंद्र बेराड सर प्रतिनिधी) बुलढाणा शहरातील प्रख्यात बालरोगतज्ञ,
मराठवाड्यातील वालसावंगी येथील भूमिपुत्र तथा बारी समाजाचे आधारस्तंभ स्व.डॉ. डी.डी.कोथळकर यांचे दि. १ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बारी समाजाचा एक आधारवड कोसळला असून समाजाची मोठी हानी झाली आहे.
सूर्यवंशी बारी समाज संस्था बुलढाणा व समस्त बारी समाजाच्या वतीने बुधवार दि. ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता अष्टविनायक नगर उद्यान, बुलढाणा येथे भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. डॉ. कोथळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या श्रद्धांजली सभेस सूर्यवंशी बारी समाज संस्था बुलढाणा चे अध्यक्ष अनिल हिस्सल, उपाध्यक्ष युवराज कापरे, कोषाध्यक्ष रमेश डब्बे, सचिव सुनील नागपुरे, संचालक पुंडलिकराव नागपुरे, प्रकाश नागपुरे, सतीश बोडखे, विष्णू नागपुरे, मानद सदस्य प्रकाश डब्बे, तसेच आर. एन. पाटील, पांडुरंग नागपुरे, ज्ञानदेव पाटील, भाऊराव राऊत, सुनील सिनकर, गणेश लाड, जिल्हा कृषि अधिकारी संतोष डाबरे, कैलास नागपुरे (LCB), प्रविण रोकडे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी स्व. डॉ. कोथळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांनी घ्यावा, असे मत व्यक्त केले.
